IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा ‘तो’ प्रकार कॅमेऱ्यात कैद, पंजाबचे चाहते नाराज

मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये 18 एप्रिल 2024 रोजी झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईने नऊ धावांनी पंजाबचा पराभव केला. मात्र या सामन्यातील 15 व्या षटकात पंचांनी दिलेल्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्यातील 15 व्या षटकाची जबाबदारी अर्शदिप सिंगच्या खांद्यावर होती आणि स्ट्राईकला सूर्यकुमार यादव होता. या षटकातील एक चेंडू अर्शदिपने उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकला मात्र पंचांनी वाईड दिला नाही. यावेळी डगआउटमध्ये बसलेल्या टीम डेव्हिडने सूर्याकुमार यादवला रिव्यू घेण्याचा इशारा केला. त्याच हे कृत्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव रिव्यू घेतो आणि पंच तो चेंडू वाईड घोषीत करतात.

विराटला पर्याय नाही! आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कोहली सलामीवीराच्या भूमिकेत

पंजाबचा कर्णधार सॅम करणने टीम डेव्हीड संदर्भात मैदानातील पंचांकडे तक्रार केली. मात्र पंचांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच सूर्याला रिव्यू घेण्याची अनुमती सुद्धा दिली. नियमामुसार DRS घेतेवेळी कोणताही खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहू शकत नाही. तसेच डगआउटमध्ये बसलेल्या प्रशिक्षक किंवा खेळाडूची मदत घेऊ शकत नाही. टीम डेव्हीडच्या या कृत्यामुळे पंजाबचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेची हायकोर्टात धाव; महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाविरोधात याचिका