ISRO Chief S Somanath – ‘इस्त्रो’चे प्रमुख सोमनाथ चरणी लीन, भोलेनाथाकडे केली ‘ही’ मागणी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस. सोमनाथ (S Somnath) यांनी गुरुवारी गुजरातमधील जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिराला भेट देऊन भोलेनाथाचे दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या सोमनाथ मंदिरामध्ये एस. सोमनाथ यांनी सोमेश्वर महापुजा केली आणि यज्ञही केला. यावेळी एस. सोमनाथ यांनी भोलेनाथाकडे चांद्रयान मोहिमेप्रमाणे ‘इस्त्रो’च्या भविष्यातील मोहिमाही यशस्वी व्हाव्यात अशी प्रार्थना केली.

देवदर्शन झाल्यानंतर एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे आमचे स्वप्न होते आणि भगवान भोलेनाथाच्या कृपेने आम्ही ते पूर्ण करण्यात यशस्वी झालो. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे मी इथे दर्शनाला आलो आहे. माझे नावही भोलेनाथाच्या नावावर आधारित आहे, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


भोलेनाथाकडे काय मागितले याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आमच्या कामासाठी ताकद हवी आहे. चंद्रावर उतरणे हे एक काम होते. आता आपल्यासमोर अनेक मोहिमा आहेत, ज्यासाठी आम्हाला ताकद हवी आहे. म्हणून मी इथे देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अद्याप झोपेतच आहेत. चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर इस्त्रोने विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अद्याप यश आलेले नाही. अर्थात आगामी काळात संपर्क झाला नाही तरी मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. इस्त्रोने या मोहिमेत मिळवलेला सर्व डाटा आणि माहिती सुरक्षित आहे.

…म्हणून मी मंदिरांमध्ये जातो, धर्मग्रंथ वाचतो; ‘इस्त्रो’च्या प्रमुखांनी केलं स्पष्ट