तांत्रिक बिघाडामुळे इंग्लंडमधील हवाई वाहतूक ठप्प झाली

तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण इंग्लंडमध्ये विमान वाहतूक ठप्प झाली आहे. या बिघातामुळे विमाने धावपट्टीवर उतरूही शकत नाहीयेत आणि उड्डाणही करू शकत नाहीयेत. एका विमानवाहतूक कंपनीने तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार नोंदवली होती ज्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एअर ट्रॅफिक कंट्रोल नेटवर्क ठप्प झाल्याचे इंग्लंडमधील विमानतळांबाहेरील प्रवाशांना सांगण्यात येत होते. या बिघाडामुळे उड्डाणे होत नसल्याचे प्रवाशांना कळताच त्यांचा पारा चढला होता.

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक बंद केली

नॅशनल एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणजेच नॅट्सने म्हटले आहे की, तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव, आम्ही विमान वाहतूक थांबवली आहे. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार  अभियंते ही समस्या दूर करण्याचे काम करत आहेत. या बिघाडामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.