जया बच्चन यांच्याकडे आहे 40 कोटींचे दागिने, अमिताभ बच्चन यांच्याकडे किती संपत्ती आहे माहिती आहे का?

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांना पुन्हा एकदा राज्यसभा (Rajya Sabha Election) उमेदवारी देण्यात आली आहे. जया बच्चन या चार वेळा समाजवादी पक्षाकडून (Samajwadi Party) राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांना समाजवादी पक्षाने पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे. जया बच्चन यांनी निवडणुकीसाठीचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यातून त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती सार्वजनिक झाली आहे. जया बच्चन या कोट्यवधींच्या मालकीण आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह मिळून त्यांची संपत्ती किती आहे त्याची माहिती देखील प्रतिज्ञापत्रातून कळाली आहे.

जया बच्चन यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे असलेल्या चल आणि अचल संपत्तीचा तपशील दिला आहे. जया बच्चन या 75 वर्षांच्या असून 2022-23 या आर्थिक वर्षात जया बच्चन या यांच्याकडे 1 कोटी 63 लाख 56 हजार रुपयांची संपत्ती होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे 57,507 रुपये रोख आणि बँक खात्यात जवळपास 10 कोटी रुपये आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे 12 लाख 75 हजार 446 रुपये रोख रक्कम आहे तर 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात आहेत. जया बच्चन यांनी इतर गुंतवणुकीबाबत माहिती दिली आहे. शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये जवळपास 5 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम गुंतवली आहे. 57,928 रुपये गुंतवले आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये 182 कोटी 42 लाख 29 हजार 464 रुपये गुंतवलेले आहेत. बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवलेला नाही. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची एकत्रित संपत्ती ही 1578 कोटींच्या घरात आहे.