सरकार मराठा बांधवांच्या भावनांशी खेळ करतेय, जितेंद्र आव्हाड यांनी व्हि़डीओ शेअर करत केली टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदारा जितेन्द्र आव्हाड यानी ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार वर टीका केली आहे. आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मराठा आरक्षणाचा सर्वे करणाऱ्या व्यक्तीला तो काय काम करतोय याबबात काहीच माहित नसल्याचे दिसत आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तोच व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकार मराठा बांधवांच्या भावनांशी खेळ करतं आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरच गंभीर आहे का..? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही, सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही, सर्व्हे नेमका कशासाठी चाललं आहे, याचच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही.एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना,ते मुंबई कडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षण संदर्भात ते किती गंभीर आहेत,हे लोकांच्या आता लक्षात येत आहे.आरक्षण देणार ते कसे देणार..? ओबीसी मधून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार.? इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार..? या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही.उलट असे सर्व्हे चे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी हे सरकार क्रूर पद्धतीने खेळत आहे.आणि हा प्रकार आपल्या या राज्याचा हिताचा नाही,हे मी निक्षून सांगू इच्छितो, असे ट्विट आव्हाड यांनी केली आहे.