भक्तांचे लालबागचा राजाला भरभरून दान

गणेशोत्सवासाठी मुंबईसह देश-विदेशातून आलेल्या भक्तांनी लालबागचा राजाच्या चरणी भरभरून दान अर्पण करायला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या दुसर्याच दिवशी लालबागच्या दानपेटीत नोटांच्या माळा, सोने आणि चांदीच्या अलंकार जमा झाले आहेत. राजाच्या चरणी आतापर्यंत 42 लाखांची रोकड, 198.550 ग्रॅम सोने आणि 5 हजार 440 ग्रॅम चांदी जमा झाली आहे. सोने आणि चांदी हे विविध प्रकारच्या अलंकाराच्या स्वरूपात आहे.

मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धुमधाम पाहायला मुंबईसह देश-विदेशासह मोठया संख्येने येत असतात. लालबागमधील लालबागचा राजा, गणेशगल्ली, तेजूराया, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, परळचा महाराजा हे राजे भक्तांचे लक्ष वेधून घेत असतात. दिवसांचे 24 तास भाविकांनी करी रोड, चिंचपोकळी आणि लोअर परळ स्थानकातील रस्ते गर्दीने फुललेले असतात.