मेरठमध्ये 25 वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम उमेदवार नाही

मेरठमध्ये 25 वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम उमेदवार देण्यात आलेला नाही. भाजपाने येथून तीनवेळा खासदार राहीलेल्या राजेंद्र अग्रवाल यांना हटवून अभिनेते अरुण गोविल यांना रिंगणात उतरवले आहे. समाजवादी पार्टीकडून सुनीता वर्मा मैदानात आहेत तर बहुजन सपा पार्टीकडून देवव्रत त्यागी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये बसपाने हाजी मोहम्मद यांना निवडणूक रिंगणता उतरवले होते. हाजी यांना राजेंद्र अग्रवाल यांच्यापेक्षा केवळ 0.39 टक्के कमी मते मिळाली होती. यावेळी अरुण गोविल यांच्या प्रभू श्री रामाच्या भुमिकेचा निवडणूकीत फायदा करून घेण्याच्या दृष्टीने भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे.