400 पारचा नारा भंपक, हे मोदींना निकालानंतर कळेल; संजय राऊत यांचा घणाघात

निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे. तो किती फसवा आणि भंपक आहे, हे निकालानंतर देशाला कळेल, जनतेला कळेल आणि स्वतः मोदींनाही कळेल. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही; हा मानस जनतेमध्ये आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला.

महाराष्ट्रात 48 जागा आहेत. गेम चेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि दिल्लीसह इतर महत्त्वाच्या राज्यांत ही चार राज्ये निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. 48 पैकी आम्ही किमान 35 हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत, असा ठाम विश्वास Sanjay Raut यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागावाटपात आपली भूमिका बजावलेली आहे. आघाडी आणि युती म्हटली की एखाद दुसऱ्या जागेवरून वाद होतो. आम्ही भाजप सोबत 25 वर्षे होतो. युतीमधील जागावाटप किती अवघड असतं, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा. प्रत्येकाला वाटतं इथं आमचीच ताकद आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मानही प्रत्येकाने राखला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या बाबतीत मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही 4 जागा तिथे लढतोय. तसं सांगलीच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून सांगलीचे जे काही प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, त्यांची एक भूमिका आहे. त्यांनी ती भूमिका व्यक्त केली. त्या भूमिकेचा आणि भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो. जसं कोल्हापूर आहे. कोल्हापूरची जागा आमची जिथे खासदार निवडून आला, ती जागा आम्ही काँग्रेसला दिली. छत्रपती शाहू महाराज हे तिथे निवडणूक लढवत आहेत. रामटेक मतदारसंघात आमचा विद्यमान खासदार तिथे होता. त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसने केली. आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. अमरावती आम्ही अनेक वर्षे लढतोय आणि जिंकतोय. तिही जागा आम्ही काँग्रेसकडे सोपवली. अशी देवाण-घेवाण ही आघाडीत होत असते. त्यानुसार सांगली आम्ही लढावी, अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी, असं आम्हाला वाटलं. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर आम्ही हा निर्णय जाहीर केला. सांगलीत जे काही थोडेफार भावना जोरदार दिसत आहेत, त्या एक दोन दिवसांत शांत होतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

तिकडे लाथा बसल्या म्हणून तुम्हाला आई आठवली, संजय राऊत मिंध्यांवर कडाडले

विशाल पाटील, विश्वजीत कदम हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजीत कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती. उद्याच्या राजकारणात विशाल पाटील यांना महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल. त्यासाठी शिवसेना पुढाकर घेईल, असं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यासंदर्भातला एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. त्यावर आज-उद्या चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल. जागावाटपात आघाडी, युतीमध्ये अशा प्रकारचे वाद-मतभेद होत असतात. ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विशाल पाटील यांच्याशी चर्चा करतील, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या टेकूवर उभे, ही लोकंच त्यांचे ‘बारा’ वाजवणार; संजय राऊत यांचा घणाघात

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष आपआपला उमेदवार जाहीर करतोय. आतापर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून एकही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीतून काँग्रेसची यादी जाहीर झाली होती. त्यात पहिले सात उमेदवार काँग्रेसने जाहीर केले होते. त्यानंतर आम्ही आमची यादी जाहीर केली. आम्हाला माहितीये आम्ही कोणत्या जागा लढतोय, काँग्रेसला माहिती ते कोणत्या जागा लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी बीड आणि भिवंडी या जागांचे उमेदवार जाहीर केले. भिवंडी संदर्भात काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीची एकजुटता आणि सांगलीतल्या लोकांना जो बदल हवा आहे, सध्याच्या खासदारांपासून जनतेला सुटका हवी आहे, हेच मेरिट आहे. संपूर्ण देशात हेच मेरिट लावून आम्ही जागावाटप करतोय. व्यक्ती म्हणून नाही तर महाविकास आघाडी, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.