Lok Sabha Election 2024 : तुमचे मतदान केंद्र कोणते? माहिती नाही? अशी मिळवा माहिती

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिलला म्हणजे उद्या होत आहे. तुमच्याकडे मतदान केंद्राची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तरीही तुमचे मतदान केंद्र कोणते आहे? घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला मतदान करण्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर जायचे आहे? हे अशा प्रकारे जाणून घ्या…

अॅपद्वारे मतदान केंद्र शोधा

सामान्य लोकांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने Voter Helpline App हे मोबाईल अॅप तयार केले आहे. हे मोबाईल अॅप अॅण्ड्रॉईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्वात आधी Voter Helpline App ला गुगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करा. अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर लॉग इन न करताही तुम्ही मतदान केंद्राचे ठिकाण बघू शकता. अॅप उघडताच सर्वात खाली स्कीपचा पर्याय येतो. स्कीपवर क्लिक केल्यानंतर अॅपमधील सर्व पर्याय समोर दिसतील. मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी अॅपच्या वर असलेल्या Search Your Name in Electoral Roll यावर क्लिक करावे.

वोटर हेल्पलाइन अॅप

वोटर हेल्पलाईन अॅप या पर्यायावर क्लिक करताच बरेच पर्याय समोर येतील. जसे की सर्च बाय मोबाईल, सर्च बाय बार/क्यूआर कोड, सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय EPIC No. इपिक नंबर हा तुमचा Voter ID Card नंबर असतो.

ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका, न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

EPIC क्रमांकावरून मतदान केंद्र ओळखले जाईल

तुम्ही कोणत्याही पर्यायाच्या मदतीने मतदान केंद्र शोधू शकता, आम्ही EPIC क्रमांकाच्या मदतीने मतदान केंद्राची माहिती मिळवली आहे. नंबर टाकून सर्च करताच तुम्हाला मतदान केंद्राची माहिती दिसेल.

हे सरकारी संकेतस्थळ करेल मदत

फोनमध्ये Voter Helpline App नसेल तर ऑनलाईनही मतदान केंद्राची माहिती घेऊ शकता. त्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

ऐसे लगाएं पोलिंग स्टेशन का पता 

वोटर सर्विस पोर्टलवर गेल्यानंतर मतदान केंद्राचा पत्ता जाणून घेण्यासाठी तीन पर्याय दिसतील. Search by EPIC, Search by Details आणि Search by Mobile.

ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास ठोस शिक्षाच नाही, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल

याप्रमाणे मतदान केंद्राची माहिती जाणून घ्या

By EPIC या पर्यायावर क्लिक केले आणि नंतर EPIC क्रमांक, राज्याचे नाव आणि कॅप्चा टाकून शोधले. तपशिलांचा शोध घेतला असता सर्व आवश्यक माहिती स्पष्टपणे दिसत होती. मतदान केंद्राची माहितीही निकालात देण्यात आली आहे.

EPIC क्रमांक असा मिळवा

सगळ्यात आधी तुम्हाला https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जायचे, या सरकारी संकेतस्थळाच्या होमपेजवर Search in Electoral Roll या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर Search by Details आणि Search by Mobile हा पर्याय दिसेल. यापैकी एका पर्यायाची मदत घेऊन एपिक नंबर मिळवू शकता. जर तुम्ही Search by Details या पर्यायालर क्लिक केले तर विचारलेल्या सर्व माहिती भरावी लागेल आणि कॅप्चा घालून सर्चवर क्लिक करावे. सर्च करताच क्षणी एपिक नंबर मिळेल. पण जर Search by Mobile हा पर्याय निवडल्यास वोटर आयडी कार्डवरचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा. ओटीपी टाकल्यानंतर एपिक नंबर दिसेल.