गृहखात्याचे अपयश लपवण्यासाठी पुणे पोलिसांना 25 लाखांचे बक्षीस, धंगेकर यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

विद्येचे माहेर घर अशी ओळख असणाऱया पुण्याची आता ‘ड्रग्जचे हब’ अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे. पुणे पोलिसांनी हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त केले असून, पुणे पोलिसांच्या कारवाईचे कौतुक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ड्रग्ज वरील कारवाईसाठी पुणे पोलीसांना 25 लाखांचे बक्षीस देऊन फडणवीस गृहखात्याच अपयश लपवत आहेत, अशी टिका आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. एकढंच होतं तर यापूर्की हे ड्रग्स का नाही सापडलं, असा सकालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ललित पाटील प्रकरणात मोठय़ा प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, संजीव ठाकूरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संजीव ठाकूरलादेखील अटक करायला हवी होती. संजीव ठाकूरला अटक करण्यासाठी गृह खात्याला पत्र दिल होत. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याचा अर्थ या प्रकरणात भाजप नेत्यांचा संबंध आहे. पुण्यात मागील दोन दिवसांत 4 हजार कोटींचे ड्रग्ज सापडलं आहे. मागील वर्षभरापासून ड्रग्ज रॅकेटचा खुलासा करा, त्याची पाळेमुळे शोधा अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र, अत्ताच हे ड्रग्ज कसे सापडले. जर हे ड्रग्ज आत्ताच सापडले तर वर्षभर तपास यंत्रणा काय करत होती?, असा सवाल मी सातत्याने विचारत आहे. मात्र, काल फडणवीस यांनी गृहखात्याचे अपयश लपवण्यासाठी 25 लाखांच बक्षिस जाहीर केल.

कुरकुंभमध्ये असणारा ड्रग्सच्या कारखान्याचा मालक कोण आहे? त्याचा शोध घेतला पाहिजे. हा कारखाना दोन दिकसांत नाही तर अनेक कर्षांपासून सुरु होता. त्यामुळे यापूर्की या कारखान्याची माहिती कशी कोणाला समजली नाही. संदीप धुनियाचा पोलीस शोध घेत आहे. त्याला 2016 मध्येही अटक केली होती. त्याकेळी त्याला जामीन कसा मिळाला?, असे अनेक प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केले. त्यासोबच या आरोपींना कोणाचा तरी करदहस्त आहे याशिकाय हे प्रकार सुरु राहू शकत नाही, असा गंभीर आरोपही केला. पुणे पोलीस आणि गृहखात्याने या सगळ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा केला तर, भविष्यात ड्रग्स किकणारा कधीही असं रॅकेट चालकण्याचं धाडस करणार नाही, असही धंगेकर म्हणाले.