Mumbai crime news : कर्जबाजारी झाल्याने केली चोरी 

कर्जबाजारी झाल्याने वृद्ध महिलेच्या घरातून तीन लाख रुपये चोरणाऱ्या नर्स महिलेला पवई पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  तक्रारदार महिला ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या वर्षी महिलेला निमोनिया झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. दिवस-रात्र काळजी घेणे गरजेचे असल्याने अटक नर्सला त्यांनी कामावर ठेवले. जानेवारी महिन्यात महिलेने कराची रक्कम आणि दवाखाना, घरभाडे म्हणून तीन लाख रुपये पाकिटात ठेवले होते. त्या पाकिटातून 50 हजार रुपये कमी असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ते पाकीट तपासले तेव्हा अडीच लाख रुपये नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या नर्सला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर तिने पैसे चोरल्याचे पोलिसांना सांगितले.