रॉकेट एकमेकांवर नको; चंद्रावर पाठवा, इराण- इस्त्रायलला मस्क यांचा मस्त सल्ला

इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान स्पेस एक्सचे मालक एलन मस्क यांनी दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या एक्स हँडलवर आपल्या सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपरचा फोटो शेअर करताना मस्क म्हणाले, कोणीही एकमेकांवर रॉकेट डागू नये, तर ते रॉकेट चंद्रावर पाठवायला हवे, असे म्हटले आहे. इराणने केलेल्या हल्ल्याच्या सहा दिवसांनंतर इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रs डागली. इस्रायलने इराणच्या आण्विक तळाचे शहर इस्फहानला लक्ष्य केले. याशिवाय इराक आणि सीरियामध्येही हवाई हल्ले करण्यात आले आहेत. मस्क यांनी काही तासांनंतर हे पोस्ट केले. यापूर्वी 13 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रs आणि ड्रोनने हल्ला केला होता. या वेळी त्यांनी इस्रायलच्या नेवाटीम एअरबेसला लक्ष्य केले होते.