ईव्हीएमशी छेडछाड झाली नाही, असा विश्वास जनतेला द्या; ईव्हीएम सुरक्षेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल आक्रमक, उपस्थित केले सवाल

लोकसभा निवडणुकांच्या सहा टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान शिल्ल्क आहे. त्यातच आता निवडणूक निकालांची चर्चा होत आहे. त्यातच अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणताही छेडछाड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र. ज्येष्ठ वकील कपिल सिब्ब्ल यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला असून ईव्हीएमशी छेडछाड झालेली नाही, असा विश्वास जनतेते निर्माण झाला पाहिजे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम हे एक मशीन आहे आणि मशीनशी छेडछाड शक्य आहे. त्यात तांत्रिक बिघाडामुळेही आकड्यांमध्ये तफावत येऊ शकते. त्यामुळे मतमोजणीपूर्वी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपण एक चार्ट बनवला आहे. त्या चार्टमधील तीन तक्तांमधील आकडेवारीची खातरजमा झाल्यावर त्या मशीनशी छेडछाड झालेली नाही, अशे दिसून येते. तसेच या तक्त्यांतील आकड्यांमध्ये तफावत आढळल्यास काहीतरी गडबड झाली आहे, असे समजून येते. याबाबत सिब्बल यांनी एक्सवर पोस्ट करत व्हिडीओशी शेअर केला आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सिब्बल यांनी म्हटले आहे की, सर्वांना माहीत आहे की मतदानाचा निकाल 4 जून रोजी येणार आहे. ईव्हीएम मशीन उघडल्यावर तुम्ही काय करावे याची माहिती मला जनतेला आणि राजकीय पक्षांना करून द्यायची आहे. म्हणून मी हे चार्ट तयार केले आहेत. सर्व पक्षांसाठी आणि सर्व मोजणी एजंट्ससाठी एक चार्ट, CU (कंट्रोल युनिट) नंबर, BU (बॅलेट युनिट) क्रमांक आणि VVPAT आयडीचा तिसरा कॉलम असेल. तिसऱ्या रकान्यात मशीन कधी उघडली जाईल याचा वेळ नमूद असेल. तो जरूर तपासावा. तसेच कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनीट, व्हीव्हीपॅट यांची वेळ आता त्यातील आकडेवारी जुळत आहे, याची खातरजमा करावी. एकूण मतदान झालेली मते आणि मोजणीत येणारी मते यांची संख्या समान असणे गरजेचे आहे. यात तफावत असल्यास काहीतरी गडबड झाली आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण बनवलेल्या तक्त्यातील कॉलमची पडताळी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात करावी, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी आणि तिथे बसलेल्या सर्व उमेदवारांनी पहिला तक्त्यातील कॉलम काळजीपूर्वक तपासावे आणि मगच ईव्हीएम मशीन उघडण्यास परवानगी द्यावू. त्यामुळे मशीनची छेडछाड झालेली नाही, याची आपल्याला आणि जनतेला खातरजमा होईल, असेही सिब्ब्ल यांनी म्हटले आहे. आता निवडणून निकालाची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.