निपाह कोरोनापेक्षा जास्त धोकादायक

देशात पुन्हा एकदा निपाह व्हायरसचा धोका वाढला आहे. निपाह व्हायरस हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे. कोरोना व्हायरसमुळे होणारा मृत्यू दर 2-3 टक्के होता तर निपाह व्हायरचा मृत्यू दर 40 ते 70 टक्के इतका आहे, अशी माहिती ‘इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) शुक्रवारी दिली आहे. केरळमध्ये आणखी एकाला निपाह व्हायरसचा संसर्ग झाला असून संसर्ग झालेल्यांची संख्या आता 6वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून चार ऑक्टिव्ह केस आहेत. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला कोझीकोडमधील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

केरळ सरकारने जारी केले परिपत्रक

केरळचे शेजारी राज्य कर्नाटकमध्ये सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. यात जनतेने केरळमधील प्रभावित परिसरात जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. निपाह व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेवून कोझीकोडे जिह्यातील सर्व शाळा, कॉलेज,  टयूशन सेंटर्ससह शैक्षणिक इन्स्टीटयूट 24 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.