अंधेरी, गोरेगावमध्ये बुधवार, गुरुवारी पाणी येणार नाही

 महानगरपालिकेकडून के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार 29 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून गुरुवार 30 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत (16 तास) हाती घेण्यात येणार आहे. सदर दुरुस्ती कालावधीत 29 मे रोजी सकाळी 9 वाजेपासून गुरुवार 30 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत (16 तास) के पूर्व, के पश्चिम व पी दक्षिण विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.