सत्यघटनेवर आधारित ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट मराठीत

एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचा 13 नोव्हेंबर 2023 रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. यात मल्याळम चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजारामुडू यांनी कमालीचा कसदार अभिनय केला आहे. डय़ुटी पूर्ण करून एस.आय. सेथू आपल्या गर्भवती बायकोला दवाखान्यात बघायला जात असतात. त्या वेळी त्याला वरिष्ठ अधिकाऱयाकडून एका खुन्याला पकडण्याची जबाबदारी येते. त्याचा मागोवा घेत असताना सेथूला सोलोमन नावाच्या माणसाची माहिती मिळते. सोलोमनचा हृदय पिळवटून टाकणारा भूतकाळ ऐकून सेथू भावनिक होतो. काय असेल सोलोमनचा भूतकाळ, हे ‘पथम वालवू’ पाहिल्यावर कळणार आहे.