मुंबईत खासगी विमान कोसळलं; खराब हवामानामुळे लॅण्डिंग करताना तीन तुकडे, 8 गंभीर

मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता यामुळे खासगी चार्टर्ड विमान 27 नंबरच्या मुख्य धावपट्टीवरून कोसळल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांच्या सुमारास घडली. विमानाचा वेग इतका होता की, कोसळल्यानंतर विमानाचे अक्षरशः तीन तुकडे झाले आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला. या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांसह एकूण आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हीएसआर एव्हीएशनचे लियरजेट एअरक्राफ्ट 45 व्हीटी-डीबीएल हे विशाखापट्टणमच्या विझाग येथून मुंबईला आलेले विमान धावपट्टीवरून कोसळले. दुर्घटना घडली त्यावेळी केवळ 700 मीटरपर्यंतची दृश्यमानता होती. त्याहून दूरवरचे काहीच दिसत नव्हते. विमान धावपट्टीवर उतरल्यानतंर प्रचंड वेगाने पुढे सरकले आणि दुर्घटना घडली.

विमानाने पेट घेतल्यानंतर तत्काळ विमानतळावर तैनात अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि गंभीर जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. z लीयरजेट 45 या प्रकरातील हे विमानअसून व्हीएसआर व्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड ही पंपनी चार्टर्ड विमानसेवा उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. व्हीएसआर व्हेन्चर ही कंपनी नवी दिल्ली, मुंबई, हैद्राबाद आणि भोपाळ या शहरांमध्ये एअरअम्ब्युलन्सदेखील उपलब्ध करून देते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मुसळधार पाऊस, निसरडी धावपट्टी, कमी दृश्यमानता त्यात विमानाचा प्रचंड वेग यामुळे विमान कोसळले. मोठा आवाज होऊन  विमानाचे तीन तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला.

विमानात जेएम बक्सी पोर्ट्स अँड लॉजिस्टीकचे एमडी ध्रुव कोटक, कु अॅपचे अध्यक्ष के. के. क्रीशनदास, आकर्ष सेठी, अरुल सली, कामाक्षी, लार्स सोरेन्सन, वैमानिक सुनील, नील होते.

विमानसेवा अडीच तास ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा अडीच तास बंद होत्या. पावणेआठच्या सुमारास विमानाचे अवशेष दूर करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या दरम्यान मुंबई विमानतळावर उतरण्याचे नियोजन असलेली सर्व विमानोड्डाणे अन्यत्र वळवण्यात आली तर मुंबईतून निघणारी 40 विमाने रखडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.