Pune Porsche Car Case : माझा बाप बिल्डर असता तर…? पुण्यातील निबंध स्पर्धा चर्चेत

पुण्यात कल्याणीनगरमध्ये बिल्डर पुत्राच्या कारने दिलेल्या धडकेत दोघांचा चिरडून मृत्यू झाला. या संतापजनक घटनेवरून पुण्यातलं वातावरण तापलं आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनीही पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. आता पुणे युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

पुण्यात कार अपघाताच्या घटनेवरून सामान्यांमध्ये संताप आणि रोष आहे. या पार्श्वभूमीवर पुणे युवक काँग्रेसने या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषयही लक्षवेधी ठेवले आहेत. या स्पर्धेत पहिले पारितोषिक 11 हजार 111 रुपये आहे. या स्पर्धेसाठी वयोगटही मर्मावर बोट ठेवणारा आहे. 17 वर्षे 8 महिने ते 58 वर्षांपर्यंतचे नागरिक या निबंध स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Pune Car Crash : मुलगा, बाप गजाआड होताच आजोबालाही अटक, ड्रायव्हरला डांबल्याचा आरोप

कुठे होणार निबंध स्पर्धा?

पुण्यात कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर ही निबंध स्पर्धा रविवारी सकाळी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील विजेत्यांना काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. विषयांमुळे ही स्पर्धा चर्चेत आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी यासंबंधी ट्विट केले होते.

काय आहेत स्पर्धेचे विषय?

> माझी आवडती कार ( पॉर्शे, फरारी, मर्सिडीज)
> दारूचे दुष्परिणाम
> माझा बाप बिल्डर असता तर?
> मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?
> अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?

या विषयांमुळे स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची स्पर्धेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. आता पुणेकर यास स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आवाज उठवणार का? याकडे आतासर्वांचं लक्ष आहे.

जनतेच्या रेटय़ामुळे ‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी अखेर कारवाई, पुण्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित