ठाण्यात इंडिया आघाडीचा दणदणीत मेळावा; मोदी, शहांचा उधळलेला घोडा आता अडवला नाही तर देशात अराजक अटळ

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विध्वंसक आहेत. विध्वंस करण्यासाठीच ते पदावर बसले आहेत. त्यांच्याकडून विधायक गोष्ट घडण्याची अपेक्षा देश ठेवू शकत नाही. मोदी आणि अमित शहांचा उधळलेला घोडा जर अडवला गेला नाही तर येत्या 15 जूननंतर देशात अराजक माजेल आणि त्यात संपूर्ण जनता होरपळून निघेल. या संकटातून देशाला वाचवण्यासाठी भाजपला 200 च्या आत रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी मंगळवारी येथे केले. शिवसेना इंडिया आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केतकर यांनी भाजपवर सडकून टीका केली.

ठाणे शहरातील पोखरण रोडवर असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मंगळवारी सायंकाळी इंडिया आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर म्हणाले की, भाजपला सत्तेतून तडीपार करायचे असेल तर आपल्याला राजन विचारे यांना देशात सर्वाधिक मतांनी निवडून आणून मोदींचा 400 पारचा नारा हाणून पाडणे आवश्यक आहे. मोदी आणि अमित शहा हे फक्त क्रूर आणि हिंस्रच नाहीत तर कपटी आणि कारस्थानीही आहेत. त्यांनी सुरुवातीला काँग्रेसमुक्त हिंदुस्थान अशी घोषणा दिली होती. मात्र नंतर विरोधकमुक्त हिंदुस्थान करण्याचा घाट घतला. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कारस्थान ओळखले आणि ते भाजपच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले. मोदींच्या रूपाने विध्वंस करणारा भस्मासुर निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत या भस्मासूराचे हात त्याच्याच डोक्यावर ठेवावे लागतील. नाही तर मोठ्या अनर्थाचा सामना आपल्याला करावा लागणार आहे, असे केतकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी, शिवसेना भाजपवाले बिथरले मोदी आणि अमित शहांच्या विरोधात आता भाजपमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दोघांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते बिथरले आहेत. आरएसएस, विश्व हिंदू परिषद या टोळ्याही आता मोदी, शहांच्या विरोधात काम करीत असल्याची कुजबुज नागपूर आणि दिल्लीत ऐकू येत आहे. परिणामी भाजपचा पराभव हा या निवडणुकीत अटळ आहे. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा जगभरात उंचावली आहे, असे भाजपवाले वारंवार बोलत असले तरी ते काहीएक खरे नाही. मोदी यांची जगभरातून टिंगल सुरू आहे, असेही कुमार केतकर यावेळी म्हणाले.

कल्याण लोकसभेतील मतदारांच्या मनामनात मशाल; वैशाली दरेकर यांचा प्रचार जोरात

ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, मीरा-भाईंदरचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार, रेखा खोपकर, समिधा मोहिते, सुजाता घाग, स्मिता वैती, नरेश मणेरा, सुरेश ठाणेकर, रामकेवट यादव, रोशनी गायकवाड आदी उपस्थित होते.