मंत्री रावसाहेब दानवेंच्या बॅनरला मराठा आंदोलकांनी फासले काळे, मराठा आरक्षणाचे श्रेय घेतल्याचा प्रकार

भारतीय जनता पार्टी ही दुटप्पी भूमिका घेत असल्याचे राज्यभरात दिसून येत आहे. शहरातील मुख्य चौकाचौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भास्कर दानवे यांचे फोटो असलेले बॅनर लावत मराठा आरक्षण दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भास्कर दानवे यांच्या बॅनरला काळे फासत निषेध व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने कुठलाही प्रकारची भूमिका पूर्ण केली नाही. कुठलीही भूमिका ठोस मराठा आरक्षणाच्या बाजूने भारतीय जनता पार्टीने किंवा कार्यकर्त्यांनी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बजावली नाही. नुसते श्रेय घेण्याचे काम हे सध्या भारतीय जनता पार्टी कडून सुरू आहे. त्यामुळे जालना शहरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भास्कर दानवे यांच्या बॅनरला काळे फासत निषेध करत इशारा देण्यात आला आहे.

मराठा आंदोलक म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा श्रेय मराठा आरक्षणामध्ये घेऊ नये व ते आम्ही घेऊ सुद्धा देणार नाही, असा इशाराही दिला.त्यानंतर तात्काळ भाजपच्या वतीने लावण्यात आलेले श्रेयवादाचे बॅनर काढण्यात आले.