Astrology । Horoscope । 25 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – शनिवारी अश्विनी नक्षत्र दुपारी 2.55 पर्यंत आहे. तसेच वरियान योग आहे. कार्तिक शुद्ध त्रयोदशी आहे. वैकुंठ चतुर्दशी आहे. पंचागानुसार आजचा दिवस शुभ दिवस आहे. आज मेष, मिथुन, कर्क, सिंह, धनू आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 9.00 ते दुपारी 10.30 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होत असल्याने आर्थिक समस्या संपण्याचे योग आहेत. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. आजच्या दिवसात आर्थिक समस्या कमी झाल्यातरी पैशांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा एनवेळी मोठे खर्च समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातही आजचा दिवस उत्तम असेल. कार्यक्षेत्रात सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने उत्साह वाढणार आहे. वरिष्ठांची मर्जी राहणार आहे. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. घरातील वातावावरण खेळीमेळीचे राहील.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होत असल्याने आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करावे लागेल. कार्यक्षेत्रात सहकारी मदत करतील. त्यामुळे उत्साह वाढलेला असेल. आजच्या दिवसात समाजात मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. आपली कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या, अन्यथा समस्यांचा सामना करावा लागेल. प्रत्येक क्षेत्रात विचार करूनच पावले उचला. एखाद्या जुन्या मित्रांची भेट झाल्याने मन प्रसन्न असेल. प्रवासाचा एखादा बेत असल्यास प्रवास फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबात काही कारणाने नाराजी राहण्याची शक्यता आहे. मात्र, जोडीदाराशी वाद घालणे टाळा, अन्यथा घरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात होणार असल्याने कार्यक्षेत्रात केलेल्या कामांमुळे लाभ होणार आहे. त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे. आजच्या दिवसात कोणताही निर्णय घाईगडबडीत किंवा गोंधळात घेऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणाचेही मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या योजनांना यश मिळणार आहे. व्यापारातही लाभाचे योग आहेत. मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. तसेच मुलांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याचे योग आहेत. घरात धार्मिक किंवा मंगलकार्ये होण्याची शक्यता असल्याने घरात उत्साहाचे वातावरण असेल.

कर्क
कर्क राशीला आज नशीबाची साथ मिळणार आहे. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होत असल्याने नशिबाला कर्माची जोड मिळणार आहे. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस लाभाचा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आजच्या दिवसात यश मिळणार असले तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाचा व्याप वाढल्याने डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. मात्र, कोणाचीही नाराजी ओढवून घेऊ नका. मतभेद असले तरी ते सध्या व्यक्त करू नका. काही काळानंतर तुमच्या मनासारख्या गोष्टी जुळून येणार आहेत. अनेक काळापासून रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण असेल.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात होत असल्याने नशिबाची साथ मिळणार आहे. आजचा दिवस फायद्याचा असला तरी व्यापारात आणि कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र, आपण संयम ठेवला तरी जोडीदाराची आणि कुटुंबियांची साथ मिळणार आहे. त्यामुळे दिवस समाधानात जाईल. जुन्या मित्रांची आणि नातेवाईकांची आठवण होईल, त्यामुळे त्यांना भेटण्याचा बेत आखू शकाल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण अष्टम होणार असल्याने आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. आजचा दिवस चांगला असला तरी तणावामुळे चिंता वाढणार आहे. त्यामुळे घरातील मुलांसोबत वेळ घालवावा किंवा त्यांच्यासोबत फिरायला जाण्याचा बेत करा, त्यामुळे तणाव कमी होईल आणि मुले आनंदित झाल्याने घरातील वातावरणही उत्साही असेल. आजच्या दिवसात जोडीदाराचेही चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आज चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत.

तूळ
तूळ राशीला आज प्रत्येक कामात दक्ष राहवे लागणार आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानात होत असल्याने दिवस चांगला असेल. कामाचा व्याप वाढला तरी सहकारी आणि जोडीदाराची साथ मिळणार आहे. मात्र, विनाकारण दगदग, धावपळ केल्यास मनस्ताप वाढणार आहे. आजचा दिवस चांगला असल्याने एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी झाल्यास मनावरील ओझे कमी होणार आहे. मात्र, कोणाची मस्करी किंवा मजा करायला जाऊ नका, अन्यथा त्यातून वाद वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचे खापर तुमच्यावर फुटण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि कुटंबियांसह एखाद्या लहान सहलीचा बेत आखू शकाल. मात्र, खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेअर बाजारात किंवा कोणतिही आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे. योग्य सल्लाशिवाय कोणतेही नवे काम सुरू करू नका.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. चंद्राचे भ्रमण षष्ठ स्थानात होत असल्याने महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत, अन्यथा ती रेंगाळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस कुटुंबासाठी चांगला आहे. एखादा शुभ समचार मिळाल्याने कुटुंबियांना भेटवस्तू देण्याचा किंवा घरासाठी काहीतरी खरेदीचे योग आहेत. मात्र, अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. त्यामुळे पैशांची बचत करून त्याची योग्य गुतंवणूक करता येणार आहे. व्यापाऱ्यांना आणि नोकरदारांना आज मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. मात्र, हितशत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. घरातील वातावरण आनंददायी असल्याने आजचा दिवस चांगला जाणार आहे.

धनू
धनू राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण पंचम स्थानात होत असल्याने कुटुंबियांसह वेळ घालवता येईल. मुलांसाठी वेळ काढता येईल. त्यामुळे मुलांचा आनंद वाढणार आहे. त्यामुळे घरातही खेळीमेळीचे वातावरण असेल. आजचा दिवस चांगला असला तरी कार्यक्षेत्रात आणि व्यापारात सावध राहण्याची गरज आहे. कामांना मनासारखा वेग मिळत नसल्याने नकारात्मक विचार मनात येतील. मात्र, त्यावर मात करत पुढे जावे लागणार आहे. कार्यक्षेत्रातही काही समस्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर द्या. राजकारण आणि गॉसिपपासून दूर राहा, अन्यथा तुमची प्रतिमा मलीन होण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून शुभ समचार मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबियांची चांगली साथ मिळणार असल्याने घरात समाधानाचे वातावरण असेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानात होत असल्याने सामाजिक कार्यात असलेल्यांना मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. आजचा दिवस संमिश्र असला तरी कुटुंबियांसोबत लहान सहलीचा बेत आखून तुम्ही उत्साही असाल. बराच काळ रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत. पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल. मात्र, धावपळीत दिवस गेल्याने थकवा जाणवणार आहे. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाणार आहे.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस आनंदाचा असेल. चंद्र तृतीय स्थानात भ्रमण करत असल्याने मनावरील दडपण कमी झाल्यासारखे वाटेल. तसेच अचानक लाभाचे योगही आहेत. आजचा दिवस चांगला असला तरी कुटुंबियांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे तुमची चिंता वाढणार आहे. कार्यक्षेत्रात उत्साहाचे वातावरण असल्याने कामे लवकर हातावेगळी करता येतील. व्यापाऱ्यांना आज कामात जास्त लक्ष घालावे लागणार आहे.मात्र, कुटुंबियांसाठी वेळ काढता येणार असल्याने घरात समाधानाचे वातावरण असेल. तसेच सामाजिक कार्यात मानसन्मान मिळण्याचे योग आहेत.

मीन
मीन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानात होत असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. तसेच अनेक योजना दृष्टीपथात येतील. तसेच एखादे नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आजचा दिवस चांगला असला तरी जोडीदाराशी वाद टाळावा लागेल. वाद टाळल्यास जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळणार आहे. शेअर मार्केट किंवा एखद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात आणि व्यापारात अधिक मेहनत घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल आणि घरातही प्रसन्न वातावरण असेल. मालमत्तेबाबतचे वाद मिटण्याचे योग आहेत. मात्र, त्यासाठी संयमाने निर्णय घेणे गरजेचे आहे.