रशियन विमान कोसळले; 65 युक्रेनी युद्धकैद्यांसह 74 ठार, युक्रेनने हल्ला केल्याचा आरोप

शियाच्या ताब्यातील 65 युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे इल्युशियन 76 प्रकारचे लष्करी मालवाहू विमान आज बेल्गोरोड सीमेजवळ कोसळून युद्धकैद्यांसह विमानातील सर्व 74 लोक ठार झाले. युक्रेनने क्षेपणास्त्र डागून हे विमान पाडल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

युक्रेनने या प्रकरणी माहिती घेत असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर या विमान अपघाताचा कथित व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. युद्धकैद्यांच्या अदलाबदलीसाठी रशियाच्या ताब्यातील युक्रेनी युद्धकैदी या विमानातून पाठवण्यात येत होते, असे रशियन लष्कराने सांगितले.

क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा

युक्रेनचा खार्किव प्रदेश आणि रशियाचा बेल्गोरोड प्रदेश लढाईचा केंद्रबिंदू आहे. याच खार्कीव प्रदेशातून दोन क्षेपणास्त्रs याच वेळी डागण्यात आल्याची नोंद रशियन रडारवर झाली होती, असा दावा रशियाने केला आहे.