सेन्सेक्स वधारला, निफ्टीने गाठला 20 हजारांचा टप्पा

रविवारी झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजारात सोमवारी नवा रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. शेअर बाजार मोठ्या उच्चांकावर खुला झाला आहे. सेन्सेक्स 68 हजार 703 पातळी ओलांडली आहे आणि तर निफ्टीने 20 हजार 601 अंकावर उडी घेतली आहे. त्यामुळे शेअर बाजारात आज विक्रमी तेजी असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदवला आहे.

यापूर्वी, सेन्सेक्सचा सर्वकालीन उच्चांक 67,927 होता, जो 15 सप्टेंबर रोजी बनला होता. निफ्टीचा सार्वकालिक उच्चांक 20,272.75 पातळी ओलांडली आहे. याआधी शुक्रवारीही निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सध्या सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 370 अंकांनी वर उसळला आहे. बाजारातील या वाढीनंतर बीएसईवर सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 4.09 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 3 डिसेंबर रोजी जाहीर झालेले राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल बाजारासाठी सकारात्मक असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.