तीन वर्षांच्या मुलाला डोळ्यांत होत होत्या असह्य वेदना….शस्त्रक्रियनंतर बाहेर काढला जिवंत कीडा

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलाच्या डोळ्यात किडा गेला होता. या किड्याने मुलाच्या डोळ्याच्या नसांना इजा पोहोचवली होती. ज्यावेळी त्याच्या डोळ्याला असह्य वेदना होऊ लागल्या त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 15 मिनीटाच्या शस्त्रक्रियेनंतर त्या किड्याला बाहेर काढण्य़ात डॉक्टरांना यश आले आहे. विशेष म्हणजे डोळ्यात गेलेला हा किडा जीवंत बाहेर काढला आहे.

मध्य प्रदेशातील पवा बसई गावातील ही घटना आहे. येथे राहणारा विरेंद्र आदिवासी यांचा मुलगा कुलदीप (3) हा रात्री झोपला असताना त्याच्या डोळ्यात एक लहान किडा गेला होता. मात्र त्यावेळी कोणाच्या गांभिर्य लक्षात आले नाही. मात्र ज्यावेळी त्याला डोळ्याला वेदना होऊ लागल्या त्यावेळी पालकांनी त्याला शिवपुरी येथील जिल्हा रुग्णालयात नेले. रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ.गिरीष चतुर्वेदी यांनी त्याचा डोळा तपासला असता. हा किडा त्या मुलाच्या डोळ्याच्या अश्रूनळ्यांजवळ आत रुतून बसला होता. किडा वारंवार मुलाच्या डोळ्यात आत रुतण्याचा प्रयत्न करत असल्याने रक्तही येत होते.

डॉक्टरांनी सांगितले की, डोळ्यातून तो किडा काढण्यासाठी लहानशी शस्त्रक्रिया करावी लागेल. ती पंधरा मिनीटांची शस्त्रक्रिया असणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुलाचे डोळे आता ठीक आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्याला औषधे देण्यात आली असून लवकरच त्याचा डोळा बरा होईल.