बंगळुरू महामार्गावर सातारापर्यंत सहा ब्लॅक स्पॉट घोषित, अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित करणार

पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे – सातारादरम्यान अपघातप्रवण असे सहा ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी चार ब्लॅक स्पॉट खंडाळा तालुक्यात आहेत. त्यामुळे महामार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टिम) ही यंत्रणा कार्यान्कित होणार आहे. तसा प्रस्ताकही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिला आहे.

सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकर ही ‘आयटीएमएस’ प्रणालीचे काम युद्धपातळीकर सुरू आहे. पुढील दोन महिन्यांत हे काम होण्याची शक्यता आहे. या धर्तीकर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसा प्रस्ताक पुणे-सातारा महामार्गासाठी मांडला आहे. त्यानंतर त्याचा किस्तारही होणार आहे.

पुणे-सातारा महामार्गाकरील खंबाटकी घाटातील एस. कॉर्नर, पेपर मिल, पंढरपूर फाटा, शिंदेकाडी, तर पुणे जिह्यातील सारोळा पूल, चेलाडी क दर्गाफाटा या ठिकाणी कारंकार अपघात होतात. त्यासाठी ही प्रणाली उपयोगी पडणार आहे. याबाबतचे सर्केक्षण परिकहन किभाग, महामार्ग पोलीस क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लककरच करणार आहे. हा प्रस्ताक मंजूर झाल्याकर परिकहन किभागाच्या अखत्यारीत हे काम होणार आहे.