Lok Sabha Election 2024: …तर तो व्हिडीओ देशभर दाखवणार होतो – भास्कर जाधव

काही दिवसांपूर्वी शृंगारतळीमध्ये एक सभा झाली. ती सभा एका राष्ट्रीय पक्षाची होती. त्यांच्या बॅनरवर विश्वगुरूंचा फोटो होता. चिन्ह होते. त्या सभेत जी भाषा वापरली ती जगामध्ये कुठेही वापरली जात नाही. ती भाषा ऐकून काही लोक टाळय़ा वाजवत होते. फिदीफिदी हसत होते, तोच व्हिडीओ मी महाराष्ट्र आणि देशभर दाखवणार होतो. पण मला उद्धवसाहेब परवानगी देणार नाहीत म्हणून मी थांबलो, असे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सांगितले. मी विदर्भातही काम करतोय. विदर्भातही मी पाचसहा आमदार निवडून आणेन. रत्नागिरी आणि रायगडचे दोन्ही खासदार निवडून आणू. तुम्ही विजयी सभेला या असा शब्द शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिला.