मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2016 मध्ये मंत्रिमंडळाची बैठक मराठवाडय़ात झाली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 15 ते 17 सप्टेंबर या काळात संभाजीनगरमध्ये सोहळा आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे समजते. मागील पंधरा वर्षांत मराठवाडय़ात राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या आहेत.