सुधीर मुनगंटीवारांची जमानत जप्त होईल! नेत्यानं सांगितलं कारण

भाजपच्या दुसऱ्या यादीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नावं जाहीर झाल. मुनगंटीवार यांना चंद्रपूर-आर्णी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली खरी मात्र स्वपक्षातूनच मुनगंटीवार यांना विरोध होण्याचं चित्र आहे. त्यातच मुनगंटीवारांची जमानत जप्त होईल, असं व्यक्तव्य काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी केलं आहे.

धोटे म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार यांचं नाव ऐकताच ग्रामीण भागातील लोक फटाके फोडत आहेत. आमची काही ओळख नाही. काही संबंध नाही. त्याला येऊ द्या, असा कसा येतोय आम्ही बघूच. केवळ चंद्रपूरातच मुनगंटीवार दिसताय. ग्रामीण भागात मुनगंटीवार यांच्याबद्दल मोठा असंतोष आहे. ग्रामीण भागात मुनगंटीवार यांनी अनेक आश्वासन दिली मात्र त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. मुनगंटीवार यांची जमानत जप्त होईल.

आज चंद्रपुरात इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होती. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार सुभाष धोटे यांनी उत्तरे दिली.