गृहमंत्री सातत्याने खोटं बोलतात, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळे यांची पुन्हा मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सध्या राज्यात जे सुरू आहे त्यासाठी गृहमंत्री जबाबदार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

”जालन्यात ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज केला. त्यानंतर ज्या पद्धतीने राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया प्रकरणं समोर आली. तसंच धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर हे सरकार काही पाऊल उचलत नाहीए. हे संपूर्ण सरकारचं अपयश जरी असलं तरी त्याला जास्त गृ़हमंत्रालया जबाबदार आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. राज्यात जे काही सध्या सुरू आहे ते गृहमंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्रालयाचा इंटेलिजेन्स विभाग आहे. त्यांना काहीच कळले नाही का? या गृहमंत्र्यांना दुसऱ्या राज्यात प्रचाराला जायला वेळ आहे पण स्वत:च्या राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहायला वेळ नाही. मी गेले अनेक दिवसांपासून ही मागणी करतेय आणि आताही मी त्या मागणीवर ठाम आहे की या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत”, असे सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

सत्ताधारी पक्षातील आमदारही मराठा आरक्षणावरून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत याबाबत विचारल्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”ज्यावेळी सत्ताधारी आमदार राजभवनावर आंदोलन करत होते.त्याचवेळी सह्याद्रीवर कॅबिनेटची बैठक सुरू होती. त्या आमदारांनी राजभवनावरून दहा मिनिटावर असलेल्या सह्याद्रीला जाण्यापेक्षा राजभवनावर आंदोलन करण्याचे ठरवले. याचाच अर्थ आता सत्तेत असलेल्या आमदारांचाही खोके सरकारवर विश्वास राहिलेला नाही”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.

‘महाधिवक्ता म्हणाले की मराठा आऱक्षणावर एका दिवसांचं अधिवेशन बोलावून काही होणार नाही, त्यांच्या या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 4 ते 5 दिवस अधिवेशन घ्यावं. प्रत्येक आमदाराला बोलायला द्या. तो प्रत्येक आमदाराचा हक्क आहे. प्रत्येकाने स्पष्टपणे भूमिका मांडायला हवी. लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य जनतेचा आवाज मांडायला इथे येतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडायला दिले पाहिजे’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

”देवेंद्र फडणवीस आमच्या घऱाबाहेर येऊन बोलले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. काय झालं त्याचं. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. दहा वर्ष झाली त्यांचं सरकार येऊन. का नाही दिलं आरक्षण?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

”मनोज जरांगे पाटलांचा दिलदारपण होता चाळीस दिवस दिले होते. साततत्याने सर्व सामाजाचा अपमान करा, त्यांना फसवा हेच या भ्रष्ट जुमला पार्टीचं खोके सरकार आहे. मुख्यमंत्र्यांकडून दगफटका होऊ शकतो हे जरांगे पाटलांचं म्हणनं बरोबर आहे. सर्वांना धोका दिलाय या सरकारने. या सर्वाला जबाबदार गृहमंत्री आहेत. कारण ते सातत्याने खोटं बोलतात. त्या दिवशी ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर आम्ही त्यांना विधानपरिषदेवर पाठवू. याचा अर्थ यांना माहित आहे की ते अपात्र ठरणार आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंनाही यांनी दगाफटका केला. आधी उद्धवजींचा पक्ष फोडला आणि आता शिंदेना अपात्र करणार. स्वत:च्या घटकपक्षालाही ते सोडत नाही. अजित पवार गटाला विनंती आहे की आपण एका ताटात जेवलो आहोत. ते आता शिंदेंनाही धोका देतायत. त्यामुळे सांभाळून रहा’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

”राष्ट्रवादीला टार्गेट केल्याशिवाय भाजपला हेडलाईन मिळत नाही. ज्याप्रकारे सोळंकेंच्या घरावर हल्ला झाला, संदीप क्षीरसागरची लहान लहान मुलं घरात होती. त्यांची पत्नी थरथर कापत होती. मुलांना वाचवायचं होतं तिला. राजनिती एका बाजूला काही माणूसकी राहिली आहे की नाही राज्यात. भाजपला मताचं राजकारण येतं. आमच्यावर यशवंराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. राजकारण एका बाजूला व माणूसकी एका बाजूला. या भाजपची माणूसकी कुठे गेली आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.