न्यूझीलंडचा पहिला नंबर; टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्वप्रथम जाहीर केला संघ

आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळणार आहेत. 15 सदस्यीय संघ जाहीर करण्याची डेडलाइन 1 मे असूनही अद्याप न्यूझीलंडनेच संघ जाहीर करण्यात बाजी मारली आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत 1 ते 29 जूनदरम्यान होणाऱया या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यात न्यूझीलंडने पहिला क्रमांक पटकावताना केन विल्यम्सनकडेच नेतृत्व सोपवले आहे. या संघांत अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जरा हटके पद्धतीने आपल्या टी-20 वर्ल्ड कप संघाची घोषणा करून क्रिकेटजगताचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंडमधील मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. संघ जाहीर करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघातील 15 पैकी 13 खेळाडू 2022 मधील वेस्ट इंडीज दौऱयावर खेळलेले आहेत.

n न्यूझीलंड संघ केन विल्यम्सन (कर्णधार), फिन एलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सॅण्टनर, ईश सोधी, टीम साऊदी.