अंधांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, सलग बाराव्या वर्षी गुजरात अव्वल

‘द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या वतीने अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा आज 12 जानेवारी, शेवटचा दिवस होता. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन संघांमध्ये अंतीम सामना रंगला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या महाराष्ट्राच्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 109 धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातने केवळ 7 षटकांमध्ये लक्ष पुर्ण करतं विजय मिळवला. केतन पटेल याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर पूर्णतः अंध खेळाडू म्हणून गुजरात संघाच्या संजय दरोडा याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सीमा सिंग, सामाजिक कार्यकर्ते विपिन आनंद, इस्लाम जिमखाण्याचे अध्यक्ष युसुफ अब्राणी, ओेएनजीसीचे श्री सचिन पटेल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सिमा सिंग, पवन पोद्दार, आरंभी संस्थेचे अध्यक्ष अरुण भास्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच स्पर्धेच्या कार्यक्रमाची प्रस्ताविका संस्थेचे डायरेक्टर अर्जुन मुद्दा यांनी सांगितली.