रिथच्या खेळाच्या जोरावर गोवा चॅलेंजर्स इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4च्या फायनलमध्ये

फॉर्मात असलेल्या टी रिथ रिश्याने 2-1 अशा फरकाने राष्ट्रीय विजेत्या श्रीजा अकुलावर निर्णायक सामन्यात विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर गोवा चॅलेंजर्स संघाने इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ही लीग सुरू आहे.

गोवा फ्रँचायझीने उपांत्य फेरीच्या लढतीत 8-7 असा फरकाने दबंग दिल्ली टीटीसीचा पराभव करून सीझन 4 ची फायनल गाठली. रिथच्या चपळ आणि आक्रमक खेळासमोर श्रीजाला हार मानावी लागली. पहिल्या गेममध्ये रिथने वेगवान फटके मारून 11-4 असा विजय नोंदवला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या श्रीजाने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना 11-6 अशा विजयासह सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पण, निर्णायक गेममध्ये चेन्नईच्या रिथने 11-8 असा रोमहर्षक विजय मिळवला.

निकाल

दबंग दिल्ली टीटीसी 7-8 गोवा चॅलेंजर्स
साथियन ज्ञानसेकरन 2-1 हरमीत देसाई ( 11-3, 11-9, 8-11)
अहिका मुखर्जी 1-2 सुथासिनी सवेत्तबट ( 5-11, 11-8, 3-11)
साथियन / बार्बोरा 2-1 हरमीत/सुथासिनी ( 8-11, 11-10, 11-10)
जॉन पेर्सन 1-2 अलव्हारो रॉब्लेस ( 11-6, 10-11, 7-11)
श्रीजा अकुला 1-2 रिथ तेनिसन ( 4-11, 11-6, 8-11)