दुबईच्या रस्त्यावर दिसली बाहुबली कार, व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटेल

दुबईतील शेखांचे छंदही फार अनोखे आहेत. कधी सोन्याने जडवलेली कार बनवून घेतात तर कधी हिऱ्यांनी जडलेली बाईक. सध्या सोशल मीडियावर ‘बाहुबली’ हमर कारचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ही भली मोठी कार पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दुबईतील शेख नावाच्या व्यक्तीने अशी बाहुबली कार बनवली आहे. ज्याला पाहून लोकांना आश्चर्य वाटले. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही कार केवढी मोठी आहे. असे वाटत आहे की, ही कार माणसांसाठी नाही तर हत्तींसाठी बनवली आहे. त्याची चाकं एवढी मोठी आहेत की, माणसंही त्यापुढे लहान लहान दिसत आहेत. ही कार फक्त दिखाव्यासाठी बनवण्यात आली नाही, तर ती रस्त्यावर धावतेही. ही बाहुबली हमर कार शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांची असून ते यूएई शाही परिवाराचे सदस्य आहेत.

जाणून आश्चर्य वाटेल की, ही बाहुबली हमर कार 14 मीटर लांब, 6 मीटर रुंद आणि 5.8 मीटर उंच आहे. या कारच्या आत बेडरूम आणि टॉयलेटचीही सुविधा आहे. या अनोख्या हमरचा व्हिडिओ @Rainmaker1973 या आयडीवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 23 सेकंदांचा हा व्हिडिओ 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 62 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.