भविष्यातील युद्धे सर्वात घातक, हवाई दल प्रमुखांची भीती

भविष्यातील युद्धे अतिशय घातक असतील. अशा युद्धांमध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी मोहिमा उघडल्या जातील. यात मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी होईल, अशी भीती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी व्यक्त केली. दरम्यान, बालाकोटसारख्या ऑपरेशनने हे दाखवून दिले की, राजकीय इच्छाशक्ती असेल तर शत्रूच्या हद्दीत घुसूनही हवाई दलाची ताकद दाखवता येते, असेही चौधरी म्हणाले.

ऐरोस्पेस पॉवर इन फ्युचर कॉन्फ्लिक्ट्स या विषयावरील चर्चासत्रादरम्यान चौधरी बोलत होते. आज सर्वच देश सामरीक सामर्थ्य आणि फायद्यासाठी अंतराळ मोहिमांवर अवलंबून आहेत, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले.