‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर

नाटककार रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले.

‘अलबत्या गलबत्या’ त्यापैकीच एक. रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घालणारे हे गाजलेलं बालनाटय़ आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक-दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचे शिवधनुष्य पेलले असून, अभिनेते वैभव मांगले पुन्हा एकदा चिंची चेटकिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अमावस्येच्या रात्रीला साथ आहे रातकिडय़ांची… बच्चेकंपनीला साद घालतेय थ्रीडी जादू चेटकिणीची’ अशी पोस्ट करत वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे टीजर पोस्टर शेअर केले. 1 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.