मस्क अचानक चीन दौऱयावर

 

टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क हे हिंदुस्थानच्या दौऱयावर येणार होते. परंतु, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे या दौऱयाकडे जगाचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी अचानक दौरा रद्द केला आणि आता मस्क यांनी अचानक आज चीनला भेट दिली. चीनमध्ये इलेक्ट्रिक कारसाठी मोठी बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे या दौऱयाची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.