बर्फाची किंमत भाकरी, दुधापेक्षा जास्त

 

आफ्रिकन देशामध्ये बर्फाच्या एका तुकडय़ाची किंमत भाकरी आणि दुधापेक्षा अधिक आहे, असे म्हटले तर कुणीही तोंडात बोटे घातल्याशिवाय राहाणार नाही. आफ्रिकन देशांमध्ये पाऱयाने विक्रम केला आहे. त्यामुळे येथील अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये अघोषित लोड शेडिंग होत असते. त्यामुळे फ्रीजमध्ये अन्न साठवून ठेवता येत नाही. परिणामी, बर्फातच अन्न ठेवावे लागते, त्यामुळे येथे बर्फाच्या एका तुकडयासाठी अक्षरशः मारामाऱया होत असून खूनही पडत असल्याचे चित्र आहे.