अॅमेझॉन, गुगल आणि मायक्रोसॉफ्टला ग्राहकांपर्यंत पोहोचणे ‘महाग’ पडणार

हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होतो. अनेक बडय़ा कंपन्यांनीही व्हॉट्सअॅपच्या आधारे हिंदुस्थानात आपला व्यवसाय करत आहेत. या कंपन्यांना आता व्हॉट्सअॅप म्हणजे पॅरेंटिंग कंपनी ‘मेटा’ने दणका दिला आहे. यापुढे अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या टेक कंपन्यांना हिंदुस्थानात व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचे असतील तर आधीपेक्षा 20 टक्के जास्त पैसे भरावे लागतील. म्हणजे प्रति मेसेज 2.30 रुपये मोजावे लागतील.

व्हॉट्सअॅपने इंटरनॅशनल वन टाईम पासवर्ड (ओटीपी) ही नवी श्रेणी आणली आहे आणि त्याद्वारे बिझनेस मेसेजचे दर वाढवले आहेत. बिझनेस मेसेज यंत्रणेतून महसूल वाढवायचा व्हॉट्सअॅपचा विचार आहे. बिझनेस मेसेज पाठवायचे असतील तर जास्त पैसे द्यावे लागतील. रिपोर्टनुसार, सुरुवातीला हिंदुस्थान आणि इंडोनेशियातील कारभारावर दरवाढीचा परिणाम होईल.

एसएमएस चार्जमध्ये वाढ

याआधी लोकल एसएमएस पाठवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या 0.12 पैसे प्रति एसएमएस एवढा चार्ज घेत होत्या, तर इंटरनॅशनल चार्ज 4 .13 रुपये प्रति एसएमएस होता. व्हॉट्सअॅपकडून इंटरनॅशनल एसएमएससाठी 0.11 पैसे प्रति एसएमएस घेतले जायचे. ते वाढवून 2.3 रुपये करण्यात आले आहेत. एका कंपनीच्या अभ्यासानुसार, ओटीटी बिझनेस मेसेजिंगची उलाढाल हिंदुस्थानात 2028 सालापर्यंत 24.2 अब्ज होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2023 मध्ये हीच संख्या 4 अब्ज होती. म्हणजेच फारच मोठय़ा प्रमाणात ओटीटी बिझनेस मेसेजिंगची होत आहे.

1 जूनपासून नवीन दर लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या नव्या निर्णयामुळे अॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या टेक कंपन्यांचे बजेट वाढेल.

व्हॉट्सअॅपची आधीची मेसेजिंग सर्व्हिस खूपच स्वस्त होती. त्यातुलनेत या कंपन्यांना आता आपले कम्युनिकेशन बजेट वाढवावे लागेल. साधारण ‘इंटरनॅशनल व्हेरिफिकेशन ओटीपी’च्या तुलनेत व्हॉट्सअॅपने व्हेरिफिकेशन करणे स्वस्त होते.
L बिझनेस मेसेजिंगवर नजर टाकली तर पारंपरिक टेलिकॉम एसएमएसचा आजही वरचष्मा दिसून येतो. एकूण मार्केटपैकी 90 टक्के वाटा टेलिकॉम एसएमएसचा आहे.

हिंदुस्थानात 7600 कोटींचे मार्केट

हिंदुस्थानात बिझनेस मेसेजिंगमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. व्यवसायवाढीच्या उद्देशाने ग्राहकांना मेसेज पाठवले जातात. सध्या बहुतांश कंपन्या व्हॉट्सअ‍ॅपवर अवलंबून आहेत. एका अहवालानुसार, सध्या बिझनेस मेसेजिंगमध्ये आपला मार्केट शेअर 7600 कोटी रुपये आहे. यापैकी 80 टक्के भाग हा एसएमएस, पुश मेसेस, ओटीपी वेरिफिकेशन, अ‍ॅप्लीकेशन लॉगइन, फायनान्शिअल ट्रन्झेक्शन, सर्विस डिलीवरी मेसेजचा आहे. अ‍ॅप्लिकेशन लॉग इन, फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन, सर्विस डिलीव्हरी, यांच्यासाठी लागणारे ओटीपी व्हेरिफिकेशन लागते. नवीन दरवाढीच्या निर्णयाची सुरुवात हिंदुस्थानापासून करण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. हिंदुस्थान मोठे मार्केट असल्याचा असा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.