रणवीरसोबत असतानाही होतं इतरांशी अफेअर; दीपिकाचा जाहीर खुलासा

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे बॉलीवूड इंडस्ट्रीतील मोस्ट फेवरेट कपल म्हणून ओळखले जातात. अलीकडेच या सेलिब्रिटी कपलने करण जोहरच्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कॉफी विथ करण 8’मध्येही सहभाग घेतला होता. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच अशा एका शोमध्ये एकत्र आले आहेत, जिथे दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. परंतु या ‘शो’च्या नवीन एपिसोडमधील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे या जोडप्याच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिका असं काही बोलली आहे, ज्यामुळे तिच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांमध्ये भरपूर चर्चा होत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी दावा केला आहे की रणवीर आणि दीपिका पदुकोण अजूनही ओपन रिलेशनमध्ये आहेत. मात्र, याआधीही सोशल मीडियावर अनेक चाहते दीपिका-रणवीरच्या रिलेशनवर चर्चा करतच होते.

कॉफी विथ करण 8 या सिझन मधील दीपिका- रणवीरचा जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यात दीपिका लग्नापूर्वी रणवीरसोबत ओपन रिलेशनमध्ये होती हे उघडपणे स्वीकारताना दिसत आहे. त्यात ती असं म्हणाली की ‘मला काही काळासाठी सिंगल रहायचे होते. तो एक असा काळ होता जेव्हा मला कोणालाच कमिटमेंट द्यायची नव्हती. मला फक्त मजा करायची होती.’ असं तिच वैयक्तिक मत होतं. यातच रणवीर माझ्या आयुष्यात आला. पण, रणवीरने मला प्रपोज करेपर्यंत मी काही कमिट केले नाही. याआधी आमच्यात कोणतीही कमिटमेंट नव्हती, त्यामुळे मी इतर लोकांनाही भेटायचे. पण मी रणवीरसोबत आहे, मला त्याच्याकडे परत जायचे आहे, हे नेहमी माझ्या मनात असायचं असं त्यावेळी दीपिका म्हणाली.


दीपिकाच्या या उत्तरानंतर करणने दीपिकाला रणवीरसोबत राहत असतानाही ती ज्यांना भेटत होती त्यांच्याबद्दल विचारले. याला उत्तर देताना दीपिकाने सांगितले की, मला आता ते लोक आठवत नाहीत. यानंतर रणवीरही दीपिकावर चांगलाच रागावलेला दिसत होता. तो दीपिकाला म्हणाला, आता तू म्हणत होतीस की माझ्यासोबत राहत असतानाही तू इतर लोकांना पाहत होतीस आणि आता ते तुला आठवत नाहीत. तो पुढे म्हणला पण, मला ते चांगलं आठवतंय. रणवीरची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.