मोदी राजवटीत ईडीच्या धाडी 86 पट वाढल्या

काँग्रेस सरकारच्या कालावधीपेक्षा भाजपच्या राजवटीत गेल्या दहा वर्षांत ईडीने मनी लॉण्डरिंगविरोधी कायद्या अंतर्गत घातलेल्या छाप्यांमध्ये 86 पट वाढ झाली आहे, तर अटक आणि मालमत्ता जप्त करण्याच्या घटनांमध्येही तुलनेने सुमारे 25 पट वाढ झाली आहे.

काँग्रेसची नऊ वर्षांची राजवट आणि भाजपप्रणित सरकारच्या एप्रिल 2014 ते मार्च 2024 या कालावधीतील ईडीच्या कामगिरीचे पीटीआयने केलेल्या तुलनात्मक आढाव्यातून ईडीच्या कारवायांची वस्तुस्थिती समोर आली आहे.  ईडीने मागील दहा वर्षांत तब्बल 5,155 पीएमएलए प्रकरणे नोंदवली असून काँग्रेसच्या काळात मात्र फक्त 1,797 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ईडीने काँग्रेसच्या काळात फक्त 84 छापे टाकले होते, तर गेल्या दहा वर्षांत 7,264 छापे टाकण्यात आले आहेत.