पिंपरीत निवासी वस्तीत जाळल्या ६ गाड्या

सामना ऑनलाइन । पिंपरी

पिंपरीतील पिंपळे गुरव भागातल्या योगेश सोसायटीत ६ गाड्या जाळण्यात आल्या. हा प्रकार कोणी केला याचा पोलीस तपास सुरू आहे. पहाटे चारच्या सुमारास गाड्यांमधून धूर आला आणि थोड्याच वेळात आगीचा भडका उडाला. स्थानिकांनी लगेच अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. आगीत ६ गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. याआधीही पिंपरीत गाड्यांची तोडफोड करण्याच्या तसेच गाड्या जाळण्याच्या घटना घडल्या आहेत.