दिल्लीत अंदाधुंद गोळीबारात एएसआयचा मृत्यू, आरोपीने स्व:तावर गोळ्या झाडून केली आत्महत्या

फोटो प्रातिनिधिक

दिल्लीच्या नंदनगरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार करत दोन लोकांवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना मीतनगर फ्लायओव्हर येथे दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. या अंदाधुंद गोळीबारात दिल्ली पोलीसांचे असिस्टेंट सब इन्स्फेक्टर दिनेश शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. तर 30 वर्षीय अमित कुमार याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार याने अचानक 7.65 एमएमच्या पिस्तुलातून अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. पहिली गोळी एका बाईकवर मारली मात्र सुदैवाने बाईकस्वार वाचला. दरम्यान त्याच्या पाठिमागून दीनेश शर्मा येत होते, त्यांना गोळी लागली. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुकेशने स्कूटीवरुन जाणाऱ्या अमितवर गोळी झाडली. गोळी अमितच्या कमरेला लागली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

एएसआय दिनेश शर्मा हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रान्चमध्ये तैनात होते. ज्यावेळी गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबाराची घटना झाली त्यावेळी ते मोटारसायकलवरुन जात होते. दरम्यान आरोपीने गोळी झाडली आणि त्यांना लागली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जखमी व्यक्तीची ओळख अमित कुमार (30) असे नाव असून तो शिलविहार, करावल नगरचा रहिवासी आहे.

त्यानंतर आरोपी मुकेश एका रिक्षात जाऊन बसला मात्र रिक्षा चालकाने नकार दिला. त्यावेळी त्याच्यावरही गोळी झाडली. मात्र चालकाने उडी घेत आपला जीव वाचवला. त्यानंतर मुकेश रिक्षाच्या पाठीमागे बसून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आङेत. मुकेश हा 44 वर्षांचा आहे., त्याने गोळीबार का केला याची अद्याप माहिती कळलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.