IPL 2024 : अब तक 150! धोनीचा आणखी एक विक्रम

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील 46वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघात रंगला. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात झालेल्या या लढतीत चेन्नई 78 धावांनी बाजी मारली. या विजयासोबत महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमध्ये इतिहास रचला. आयपीएलमध्ये 150 विजय पाहणारा धोनी एकमेव खेळाडू ठरला आहे.

धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 259 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या धोनीने 150 विजय बघितले आहेत. याबाबत रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

आयपीएममध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू

एमएस धोनी – 150 विजय
रोहित शर्मा – 133 विजय
रविंद्र जडेजा – 133 विजय
दिनेश कार्तिक – 125 विजय
सुरेश रैना – 122 विजय

पूर्वपुण्याई की फॉर्मला मिळणार न्याय; हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कप संघाच्या निवडीची आज शक्यता

दरम्यान, धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 39.53च्या सरासरीने 5478 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्येही त्याची गणना होती. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळी ट्रॉफी उंचावली आहे.

IPL 2024 : राजस्थानही आऊट होऊ शकतो… जर-तरच्या समीकरणावर रंगणार आयपीएलचा खेळ