संसद भवनात ‘वास्तूदोष’ असल्याचा दावा करणाऱ्या वास्तू तज्ज्ञाला कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणात अटक

प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ खुशदीप बन्सल यांनी संसद भवनाच्या ग्रंथालयात ‘वास्तूशास्त्रातील दोष’ असल्याचं सांगत सरकार पडण्याचं ते कारण दावा करून खळबळ उडवली होती. जवळपास 30 वर्षांनंतर बन्सल यांचे नाव पुन्हा एकदा समोर आले असून यावेळी ₹ 65 कोटी रुपयांच्या मोठ्या फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आसाम पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सहकार्याने बन्सल आणि त्याच्या भावाला सोमवारी अटक केली. विशेष सेलच्या काउंटर इंटेलिजन्स युनिट (सीआय) ने राष्ट्रीय दिल्लीच्या बाराखंबा परिसरात ही अटक केली.

सोमवारी सकाळी, आसाम पोलिसांनी आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर त्यांना ताब्यात घेतले आणि तात्काळ आसामला रवाना झाले, जिथे त्यांच्यावर ₹ 65 कोटी घोटाळ्याचे आरोप आहेत. या घोटाळ्यात मध्य प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे.

दिल्लीस्थित सबरवाल ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक कमल सबरवाल यांनी बन्सल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

बन्सलने दिल्ली पोलिसांकडे खुलासा केला की त्याने कमल सबरवालशी एका व्यक्तीची ओळख करून दिली होती आणि शेवटी फसवणुकीत स्वतःला अडकवले होते. त्याच बरोबर आसाम पोलिसांचा असा दावा आहे की सर्व आरोपींनी या घोटाळ्याचा कट रचण्यात सहकार्य केलं होतं जे आता उघड झालं आहे.

बन्सल हे राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांचे सल्लागार आणि प्रख्यात व्यापारी आणि उद्योगपतींचे धोरणात्मक सल्लागार आहेत.

1997 मध्ये, संसद भवनाच्या ग्रंथालयाच्या वास्तूतील दोषांमुळे सरकारी अस्थिरता निर्माण होत असल्याचा दावा केल्यानं त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.