रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

लोकसभा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), लोकसभा प्रमुख राजू महाडिक (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), लोकसभा सहसंपर्कप्रमुख गीतेश राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा), उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे (रत्नागिरी विधानसभा),  उपजिल्हा संघटक सुजित कीर (रत्नागिरी विधानसभा)