लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकपदी विश्वनाथ नेरुरकर (मुंबई उत्तर लोकसभा), संतोष जाधव (कल्याण लोकसभा) आणि महेश नेने ऐरोली-बेलापूर
(ठाणे लोकसभा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.