मराठा आंदोलकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मिंधे गटाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांची गाडी रविवारी मराठा आंदोलकांनी गद्दार देगाव कुर्‍हाडा येथे फोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

आमदार बालाजीराव कल्याणकर हे आज 17 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुर्‍हाडा येथे एका लग्न समारंभासाठी आले होते. लग्न सोहळ्यात ते बसले असताना दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीवर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत अज्ञातांनी दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. त्यांच्या वाहनाच्या काचा मराठा आंदोलकांनी फोडून निषेध व्यक्त केला. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत या गद्दार आमदाराची गाडी फोडण्यात आली.