लोकसभेत ताकद दाखवणार! 30 मार्चला निर्णय, मनोज जरांगे यांचा इशारा

मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची भाषा करून मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला, तर गृहमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांवर गुन्हे दाखल केले. हे पाप कुठे फेडणार? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सिंधे सरकारला विचारला. पिढ्या‌न्पिढ्या तुमच्या अंगावर गुलाल टाकणारे मराठे आता थांबणार नाहीत. तुम्हाला घरी बसवण्यासाठी आता प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा पर्याय असून, त्यातून लोकसभेत मराठा समाजाची ताकद दाखवणार, असा निर्धार करीत, 30 मार्च रोजी निर्णय जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस यांनी सात महिने झोपा काढल्या का?

फडणवीसांची दुसरी एक किमया आहे. गुन्हे मागे घ्यायला आचारसंहिता कारण सांगितले, सात महिने काय झोपा काढल्या का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. यवतमाळचे एसपी महिलांना बसवून ठेवत आहेत. आंतरवालीच्या बैठकीला येण्यासाठी त्यांना थांबवले जात आहे. पण आता मराठे थांबणार नाही, आता तुम्हाला घरी बसवतील, असे जरांगे म्हणाले.

मतदान कराल त्याच्याकडून लिहून घ्या

मराठा समाजाचे 17 ते 18 मतदारसंघांवर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लिम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा तू सगेसोक्ऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..? हा प्रश्न त्या उमेदवाराला विचारला गेलाच पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.

सकल मराठा समाजाची रविवारी आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सरकारने गेल्या काही दिवसांपासून बॅण्ड वाजवणाऱ्यांवर, साखळी उपोषण करणाऱ्यांवर, रॅली काढणाऱ्या मराठ्यांवर गुन्हे दाखल केले. हे पाप कुठे फेडणार आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती.

व्होटबँकेची ताकद दाखवणार

मराठा समाज मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणार होता. ते अडचणीचं झालं असतं. मराठा समाजाला त्यांची शक्ती दाखवायची असेल तर उमेदवारही तुम्हीच द्या. फॉर्मही तुम्हीच ठरवा. पुढचा निर्णय ३० तारखेला जाहीर करू. मी राजकारणात उतरणार नाही. कारण तो माझा मार्ग नाही. राजकीय शक्ती दाखवायची असेल तर मतांमध्ये रूपांतर करायचे असेल तर हजार आणि दहा हजार फॉर्म भरू नका. एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा म्हणजे ताकद दिसेल. मी निवडणुकीला उभा राहणार नाही. पण मराठा व्होट बँक काय आहे ती ताकद दाखवून देणार असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री मराठा समाजाच्या नजरेतून उतरू लागले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खूप विश्वास होता. अपेक्षा होती. तरीही तुम्ही आमच्या विरोधात गरळ ओकली, आमचा करेक्ट कार्यक्रम करत असे म्हणाले. शिंदे तुम्ही मराठा समाजाच्या नजरेतून उतरून रोष पत्कारला आहे. त्यामुळे ज्यांना तुम्ही आजवर सावलीत बसवले त्यांना उन्हात आणा. तसेच सगेसोयऱ्याचा शब्द तुम्ही आमच्याकडे पाठवलेल्या न्यायाधीशांनी काढलेला शब्द आहे. आमचा नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पाठवलेल्या न्यायाधीशांनी काढलेला शब्द आहे. आमचा नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

या बैठकीला आज राज्यातील कोना-कोपन्यातून मराठा समाज एकटवला होता. त्यामुळे संपूर्ण आंतरवाली सराटी परिसर समाजबांधवांनी भरून गेले होते. त्यानंतर बैठकीस्थळी येण्यासाठी उशिरापर्यंत रांगाच रांगा सुरू होत्या. काही समाजबांधवांना बैठकीस्थळी येईपर्यंत तास दीडतास लागला. इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.