तात्या विंचू परत येतोय!

 

ओम फट् स्वाहा’ म्हणत येणारा तात्या विंचू पाहिला की अनेकांची घाबरगुंडी उडायची. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी तात्या विंचू सज्ज झालाय. आदिनाथ कोठारे याने ‘झपाटलेला-3’चे पोस्टर शेअर करत पुढच्या वर्षी हा चित्रपट येणार असल्याचे सांगितले. पोस्टरमध्ये कपाळावर गोळी लागलेला तात्या विंचू आणि आदिनाथ कोठारे दिसतोय. ‘झपाटलेला… मी तात्या विंचू’ असे या चित्रपटाचे नाव असून दिग्दर्शनाची धुरा महेश कोठारे हेच सांभाळणार आहे. चित्रपटाबद्दल आतापासूनच उत्सुकता वाढलीय.