नगर उड्डाणपुलाखाली अपघात, गाडीवर खांबाचा भाग कोसळला

नगरच्या उड्डाणपुलाबाबत आणखी एक अपघात घडला आहे. मात्र हा अपघात उडन पुलावरून नसून उड्डाण पुलाखाली झाला आहे. उड्डाणपूला खालून जाणाऱ्या एका गाडीवर खांबाचा एक भाग कोसळला. मोठा आवाज झाला आणि ही गाडी चालवणाऱ्या पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्याला आपली गाडी बाजूला लावावी लागली.

त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर गाडीवर भला मोठा खांबाचा सिमेंटचा भाग कोसळलेला होता त्यांनी गाडी ती गाडी तसेच थांबवली आणि विमा प्रतिनिधीला फोन केला. नियमित अपघातांची मालिका देणाऱ्या बहुचर्चित उड्डाण पुलावर पुन्हा एकदा काहीतरी अपघात झाला आहे आणि पुलाचा भाग खाली कोसळला आहे, अशी अफवा नगरमध्ये पसरली होती. बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी झाली होती.काही राजकीय कार्यकर्ते तिथे जमा झाले त्यांनी याचे चीत्रीकरण करू नका अशी विनंती पत्रकारांना केली.

पण हा उड्डाण पुल तकलादू आहे. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याची अनेक उदाहरणे या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातातून पुढे आली आहेत. सुरुवातीच्या काळात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले. परवा दिवशी एक धान्याची पोती घेऊन जाणारा ट्रक या उड्डाण पुलावर उलटला. उड्डाणपुलावर गाडी उलटण्याच्या घटना घडणं हे खूप गंभीर आहे. तरी देखील असे घडल्याचे तज्ञांचे मत आहे, आम्ही उड्डाणपूल मोठ्या कष्टाने बांधला त्याचे श्रेय आमच्याकडेच आहे, अशा वल्गना करणाऱ्यांनी आता काय सांगायचे असा सवाल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी विचारला आहे.

उड्डाणपुलाची टक्केवारी खाऊन श्रेय लाटत रोज चर्वितचर्वण करणाऱ्या या नेत्यांनी काहीतरी लाज बाळगावी, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा अपघात घडला तेव्हा या गाडीत दोनच जण होते. गाडीचे नुकसान झाले गाडीची काच फुटली. टपावर सिमेंट दगड पडल्याने वरचा भाग चेमटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. पण यापूर्वी या उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली झालेल्या अपघातांमध्ये आठवड्याला एक बळी तरी गेलेला आहे, या कामाची चौकशी होऊन उड्डाणपुलाची योग्य डागडुजी करावी आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले असल्यास ते व्यवस्थित करण्यासाठी योग्य ते पावले उचलण्याची गरज आहे.